फुले वार्ड क्रमांक 02 मध्ये पाण्याची.भिषण समस्या! नगरसेवक झोपेत!.
गडचिरोली.(जिल्हा प्रति)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
फुले वार्ड क्रमांक 02 मध्ये ,उन्हाळ्या अगोदरच पाण्याची भीषण समस्या निर्माण झालेली असून. वार्डातील टिल्लू पंपधारकच पाण्याचा मनाजोगे मोठ्या प्रमाणात उपसा करून स्वतः बरोब्बर घरातील भाडेकरूंना जगविताना दिसत आहेत.
ज्यांच्याकडें काहीच नाही.त्यांना पाण्यासाठी इतरांच्या घरी वणवण भटकावे लागत आहे. प्रसंगी तिखट बोलणेही ऐकावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
फुले वार्डातील निवडून येणारे आमचे दानशूर जनप्रतिनिधी स्वतःच्या चेहऱ्यावर पघरून ओढून घरामध्ये झोपी गेल्याचे दिसून येत आहेत.
राजकीय दबावाखाली जगणारी. टिल्लू पंप धरपकड करणारी नगरपरिषदेची यंत्रणा फुले वार्डातील दुष्काळ ग्रस्त पाणी समस्येकडे नजरे टाकताना दिसत नाही?.

