Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीसामाजिक आंदोलनाच्या दबावानंतर अनिल नगराळे अटकेत – पीडितेला न्याय”

सामाजिक आंदोलनाच्या दबावानंतर अनिल नगराळे अटकेत – पीडितेला न्याय”

सामाजिक आंदोलनाच्या दबावानंतर अनिल नगराळे अटकेत – पीडितेला न्याय”

चंद्रपूर (प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम

.चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नवेगाव येथे महिलांवर सातत्याने अत्याचार, धमक्या आणि मानसिक छळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध अखेर पोलिसांच्या मोठ्या कारवाई नंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 अनेक दिवसापासून कायद्याच्या पळवाटा शोधणारा आरोपी अनिल अशोक नगराळे हा पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसी कारवाईमुळे त्या परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

.अन्यायाने ग्रस्त असलेली पीडित महिला सौ. कविता भीमप्रकाश आकेवार यांच्या धाडसी पुढाकाराने व घेतलेल्या निर्णयाने गडचांदूर पोलीस स्टेशन मध्ये FIR नोंदविण्यात आले 

अनेक दिवसापासून आरोपी हा मोकाट फिरत असल्याने आरोपीच्या विरोधात नागरिकांने संताप व्यक्त केलेला आहे.

या प्रकरणात विविध सामाजिक संघटना, स्थानिक नागरिक आणि विशेषतः *डॉ. समय्या पसुला (महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटना – संस्थापक अध्यक्ष)* यांच्या नेतृत्वाखाली 

आंदोलनाचा इशारा देताच व प्रशासनावर दबाव वाढताच अखेर पोलिसांना आरोपीच्या विरोधात कारवाई करणे भागच पडले.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 74, 79, 115(2), 351(2), 3(5) अन्वये गुन्हे दाखल केलेले असून.अन्याय ग्रस्त महिलेला न्याय मिळालेला असून लढा अजून बाकी! आहे.

आरोपीच्या अटकेनंतर पीडित महिला व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केलेले असले तरी, आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका समाजबांधवांनी मांडलेली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular