साखेरा ग्रामसभा गाजली ग्रामस्थांच्या आवाजांनी
कारवाफा (05.जून.)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
धानोरा पंचायत समिती अंतर्गत येतं असलेली ग्रामपंचायत साखेरा येथील ग्रामसभा गावकऱ्यांच्या एकमुखी आवाजांनी गाजली .
या ग्रामसभेत ग्रामस्थानी खरेदीचे.अनेक मुद्दे उपस्थित केलेले असुन
ग्रामस्थानी विचारलेल्या अनेक मुद्यांना सरपंच व ग्रामसेवक यांनी कुठलेही उत्तर न देता पळवाटा शोधून गावकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू लागले.
ग्रामपंचायत अंतर्गत केलेले कामे व केलेल्या साहित्यांची खरेदी ही सरपंच व ग्रामसेवक यांच्या मंनमर्जीने करण्यात आले असल्याचे अनेक आरोप ग्रामसभेने आज 05 जून रोजी झालेल्या ग्रामसभेतून व्यक्त केले.
तर काही ग्रामस्थानी ग्रामपंचायतीला ताला ठोकण्या बद्दल भाष्य करू लागले.
ही ग्रामसभा ग्रामस्थ बघेल या तरुणांनी गाजविली त्यांच्या अनेक प्रश्नांना महिला व पुरुषांनी प्रतिसाद दिला.

