अनुदानित अंध,अपंग, मूकबधिर. शाळेच्या चौकशीची मागणी.!
अनुप मेश्राम
गडचिरोली.,( वि. प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
जिल्हास्तरावरील जिल्हापरिषद व समाज कल्याण विभागां अंतर्गत सुरू असलेल्या अंध, अपंग व मुकंधिर या दोन्ही विभागांतर्गत येणाऱ्या अनुदानित शाळा अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत
काही शाळा अनुदान लाटण्यापूर्तीच नाममात्र सुरू ठेवून शासनाचे अनुदान घश्यात लाटण्याचे कामे करताना दिसत आहेत. शाळेच्या निवासस्थान.भोजन व्यवस्था . शाळेतील पटसंख्या यांचीही चौकशी करण्यात यावी.
तसेच काही अनुदानित शाळेची व शाळेत शिकणाऱ्या मुला मुलीची स्थिती अतिशय दयनीय असून त्यांचे पुढील भविष्यही धोक्यात आहे.
अंध,मूक, बधीर अनुदानित शाळेमध्ये एकाच कुटुंबांचा अधिक अधिक भरणा दिसत असून संचालकांच्या.नाते संबंधातील कर्मचारी शाळेत आपले तोंडही न दाखविता घर बसल्या पगाराची उचल करताना दिसत आहेत.
जिल्हा स्तरावर कार्यरत असलेल्या शासनाचे करोडो रूपये घशात , ओतणाऱ्या अंध, अपंग मूकबधिर शाळाची विभागीय स्तरावरील कर्तव्यनिष्ठ. प्रामाणिक.अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अनुप मेश्राम यांनी केलेली आहे.

