जिल्हा महिला व बाल रुग्णालयात ‘जागतिक स्तनपान सप्ताहाचा’ उत्साहात समारोप
गडचिरोली (प्रतिनिधी)
विचार क्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम
गडचिरोली जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे १ ते ७ ऑगस्ट दरम्यान आयोजित ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी व मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सप्ताहाचा समारोप ७ ऑगस्ट २०२६ रोजी बाह्यरुग्ण विभागात (OPD) जिल्हा शल्य चिकित्सक मा. डॉ. वर्षा लहाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
सप्ताहाचे उद्घाटन व विविध उपक्रम
या सप्ताहाचे उद्घाटन १ ऑगस्ट रोजी विशेष नवजात शिशु काळजी कक्ष (SNCU) वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके, प्रसूतीतज्ज्ञ डॉ. प्रशांत आखाडे आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. निखिल चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. सप्ताहादरम्यान पीएनसी वॉर्ड (नॉर्मल व सिझेरियन), बालरोग विभाग, एएनसी वॉर्ड आणि एनआरसी (NRC) मध्ये दररोज स्तनपानाविषयी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.
जनजागृती आणि उत्स्फूर्त प्रतिसाद
रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी आयोजित चर्चासत्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी संवादातून अनेकांचे स्तनपानाविषयीचे गैरसमज दूर करण्यात आले. प्रात्यक्षिकांद्वारे अचूक माहिती देण्यासाठी ब्रेस्ट मॉडेल, बाहुली (Baby model), पोषक आहाराची माहिती देणारी डाएट थाळी आणि फ्लिपचार्टचा प्रभावी वापर करण्यात आला. या निमित्ताने रुग्णालयात पोस्टर्स, घोषवाक्य (Slogans) आणि रांगोळी स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. प्रसूतीपश्चात कक्षात शुश्रूषा प्रशिक्षणार्थींनी (Nursing Trainees) अतिशय सुंदर प्रबोधनात्मक नाटिका सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
मातांना देण्यात आलेले महत्त्वपूर्ण मार्गदर्शन:*
सप्ताहादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांनी मातांना व नातेवाईकांना खालील विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले
प्रसूतीनंतर आई व बाळाचा ‘स्किन टू स्किन’ (Skin to skin) संपर्क.*
जन्मानंतर पहिल्या एका तासाच्या आत स्तनपान सुरू करणे.
बाळाच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी ‘चीक दुधाचे’ अनन्यसाधारण महत्त्व.
पहिले ६ महिने केवळ आणि निव्वळ स्तनपान.
*स्तनपानाच्या योग्य पद्धती आणि आई व बाळाची योग्य स्थिती (Positioning).
झोपलेल्या बाळाला उठविण्याची पद्धत आणि बाळाच्या भुकेची लक्षणे ओळखणे.
दर २ तासांनी किंवा बाळाच्या मागणीनुसार दूध पाजणे आणि दूध पाजल्यानंतर ढेकर काढण्याची (Burping) गरज.
एका वेळी एकच स्तन पूर्णपणे रिकामे करणे जेणेकरून बाळाला ‘Foremilk’ (सुरुवातीचे पातळ दूध) आणि ‘Hindmilk’ (नंतरचे घट्ट व पौष्टिक दूध) दोन्ही मिळेल.
६ महिन्यांनंतर योग्य पूरक आहाराला सुरुवात करून स्तनपान सुरूच ठेवणे.
स्तनपानामध्ये वैयक्तिक स्वच्छता, तसेच कुटुंब आणि समाजाचा सहभाग.
समारोपीय कार्यक्रम*
७ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक मा. डॉ. वर्षा लहाडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके, प्रसूतीतज्ज्ञ डॉ. प्रशांत आखाडे, बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय करपते, क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. नीलकंठ मसराम उपस्थित होते. तसेच ‘पाथ सीएचआरआय’ संस्थेच्या डॉ. अपूर्वा आकरे, डॉ. सृष्टी पाटील, साहिल शेंद्रे आणि सहाय्यक अधिसेविका श्रीमती कविता पोतरोजवार यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. या सप्ताहामुळे माता व नातेवाईकांमध्ये स्तनपानाबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे

