गडचिरोली जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्याचा महान प्रताप ! प्रत्यक्ष बंधाऱ्याचे कामे सुरू न करताही दिले 2 कोटींचे देयके, !
गडचिरोली ( विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली जिल्हा जलसाधारण विभागा अंतर्गत या जलसंधारण विभागाने एटापली तालुक्यातील उडेरा.तुमरगुंडा, मंगुटा,बिद्री. पयमा,बटेली हेगट्टा, गुडेली ,जवेली (बु) व आजुबाजूच्या गाव परिसरात अहेरी जलसंधारण उप विभागाने जिल्हा जलसंधारण विभाग यांच्या प्रभावाखाली एटापल्ली परिसरात 25 कोटी रुपयांची 13 बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतलेली होती.
परंतु या विभागाने प्रत्यक्षात एकही बंधाऱ्याचे कामे न करता. 01कोटी.25 लाख रुपयांची देयकांची उचल केलेली आहे
तसेच, अहेरी.भामरागड. आणि सिरोंचा तालुक्यातील व्यंकटरावपेठा, बोडूकसा, बोरमपायल्ली, नेलगुंडा 2 या सारख्या 10 गावात प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारची कामे न करता 01कोटी.17लाख रुपयांची देयकांची उचल केलेली आहे
.ही उचल केलेली देयके मागील वर्षांच्या जून महिन्यात दिले गेलेले आहेत.
आमचे सदर प्रतिनिधी एटापल्ली तालुक्यातील 13 गावांना व अहेरी,भामरागड, सिरोंचा तालुक्यातील 10 गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन सबंधित कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता .या परिसरातील संपूर्ण कामाची खरी सत्यता बाहेर आलेली आहे.हे विशेष.

