अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांना त्वरीत निलंबित करण्यात यावे ! अनुप मेश्राम.
गडचिरोली( विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम
तीन वर्षापूर्वी लाखो.करोडो रुपये खर्चुन बांधण्यात आलेले. कोठी कोरणार पूल उध्वस्त होऊन आज, वीस ते पंचेवीस दिवसांचा कालावधी लोटला जात आहे.
शासनाने व प्रशासनाने या गंभीर बाबीकडे हेतू पुरस्पर डोळे झाक करून.सा.बा अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांना अभय देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
शासन व प्रशासन यांच्या दुर्लक्षणामुळे सबंधित अधिकाऱ्यांची छाती उंचावलेली असून यांच्या प्रशासकीय कार्यकाळात अनेक बोगस कामे करून धनवानांच्या पंगतीमध्ये आज बसताना दिसत आहेत
.कोठी कोरणार या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांना त्वरित निलंबनाची मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अनुप मेश्राम यांनी केलेली आहे.
अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांच्या निलंबनासाठी जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना पुढे सरसावलेल्या असून जो.तो .त्यांच्या निलंबनासाठी आदोलनाची तयारी दर्शविताना दिसत आहे.
संपूर्ण जिल्हा वाशियांचे लक्ष अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांच्या निलंबनाकडे लागलेले आहे.

