Friday, June 5, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीसुनीलभाऊ आंबोरकर यांची DYSP पदी नियुक्ती .सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव!

सुनीलभाऊ आंबोरकर यांची DYSP पदी नियुक्ती .सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव!

सुनीलभाऊ आंबोरकर यांची DYSP पदी नियुक्ती .सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव !

गडचिरोली. (विशेष प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

गडचिरोली शहरातील सर्वोदय वार्ड येथील मूळचे रहिवाशी असलेले स्वर्गवासी जयवंतराव आंबोरकर यांचे सुपुत्र सुनील आंबोरकर यांचे (डी.वाय एस.पी.) या राजपत्रित अधिकारी या पदावर त्यांची पदौन्नोती झालेली आहे.

सुनील आंबोरकर हे सन 1988 मध्ये केंद्रीय पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असताना. त्यांच्या प्रमोशनचे आदेश महामय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्म यांच्या साक्षरीने गृहमंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या कार्यालयाद्वारे जारी करण्यात आलेले आहे.

श्री.सुनील आंबोरकर यांनी आपले चौथी पर्यंत शिक्षण बेसिक शाळेत, दहावी पर्यंतचे शिक्षण वसंत विद्यालय. व पदवीपर्यंतचे शिक्षण शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे घेतलेले आहे.

वर्ष 1988 येथे केंद्रीय रिझर्व पोलीस दलात भरती होऊन व वेळोवेळी परीक्षा देऊन प्रथम सहाय्यक उपनिरीक्षक.2005 मध्ये उपनिरीक्षक.2016 मध्ये पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती सुधा घेतलेली आहे.

पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असताना त्यांची डी. वाय.एस.पी.(सहाय्यक कमांडर ) या पदावर प्रमोशन झाल्यानंतर पोलीस दलाचे जन्मस्थान असलेले जिल्हा मध्यप्रदेश येथील ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षक म्हणून पदस्थ झालेले आहेत.

1988 पासून तर आजवर भारताच्या विभिन्न राज्यातील जम्मू काश्मीर, आसाम, छत्तीसगड,केरळ.तामिळनाडू. पांडेचरी,आंध्रप्रदेश. कर्नाटक इत्यादी राज्यात सेवेत कार्यरत असताना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल अनेक पदके देऊन त्यांना गौरवण्यात सुद्धा आले.

 गडचिरोली येथील तेली समाजातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले. केंद्रीय दलातील सेवेत राहून आज वर्ग 01अधिकारी या पदावर पोहोचणारे पहिले अधिकारी  म्हणावे लागेल.

 त्यांचे बालपण सामान्य गरीब शेतकरी कुटुंबात गेले. त्यांना लहानपणा पासून सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची आवड होती. सैन्यातील कठीण प्रशिक्षण व ट्रेनिंग घेऊन स्वतः एक चांगले प्रशिक्षक सुद्धा झालेले आहेत. 

मनमिळाव स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे व त्यांच्या झालेल्या प्रमोशन बद्दल संपूर्ण तेली समाजात,मित्रपरिवार व नातेसंबंधात त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

विचार क्रांती न्यूज परिवारातर्फे त्यांना कोटी कोटी मनपुर्वक शुभेच्छा.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular