Friday, March 27, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीमुरमाडी येथील सार्वजनिक विहिरीच्या पाण्याचा घर बांधणीसाठी वापर ! 

मुरमाडी येथील सार्वजनिक विहिरीच्या पाण्याचा घर बांधणीसाठी वापर ! 

मुरमाडी येथील सार्वजनिक विहिरीच्या पाण्याचा घर बांधणीसाठी वापर ! 

गडचिरोली.( विशेष प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

गडचिरोली पंचायत समिती व पेसा कायदा अंतर्गत येत असलेल्या मुरमाडी या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई जाणवत असताना सुद्धा .काही घरकुल लाभार्थ्यांनी गावातील सार्वजनिक विहिरीवर आपला हक्क व अधिकार गाजवून सार्वजनिक विहिरीवर घरकुल बांधणीसाठी मोटारपंपचा वापर करून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करीत असल्यामुळे गावातील व मुरमाळी टोळीवरील गरजू लोकांना पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे.

मुरमाड टोळीवर वास्तव्याने असलेले. अपंगत्वाने खाटेवर पडून मरण यातना भोगणाऱ्या धोंडुजी नेताम कुटुंबियांना सार्वजनिक विहिरीचे पाणी वापरण्यास घरकुल लाभार्थी मज्जाव करीत असल्यामुळे घोटभर पाणी मिळणं कठीण जात आहे.

ग्रामपंचायत कार्यालया मध्ये घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांची मोटाटपंप बंद करण्यासाठी विनंती केली असता. घरकुल लाभार्थ्यांन कडून तक्रारदारावर दबाव टाकला जात असल्याचे सांगितले जात आहे.

सरपंच व ग्रामसेविका यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांच्या सोबत संपर्क होऊ शकला नाही.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular