मुरमाडी गावातील बौद्ध वस्तीमध्ये घाणीचे साम्राज्य.! सर्वत्र दुर्गंधीचा महापूर!
गडचिरोली.( जिल्हा प्रतिनिधी )
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम
गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या. मुरमाडी गावातील बौद्ध वस्तीमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले असून. सर्वत्र दुर्गंधीचा महापूर दरवडतांना दिसत आहे.
बौद्ध वस्तीमध्ये कित्येक दिवसापासून ग्रामपंचायतीने नाल्यांचा उपसाच न केल्यामुळे नाल्या घाणीने आणि सांडपाण्याने तुडुंब भरलेल्या असून . नाल्यातील दुर्गंधी घराघरांमध्ये पसरलेली असून वस्तीतून चालताना बौद्ध लोकांना नाकात रुमाल बांधूनच बाहेर निघावे लागते. ही अवस्था बौद्ध वसाहतीत निर्माण होताना दिसत आहे .
गावातील सरपंच आणि ग्रामसेवक हेतूपूरस्पर बौद्ध वस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे बौद्ध वसाहतीत जीव घेणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.याला सर्वस्वी सरपंच व ग्रामसेवक हेच जबाबदार असून बौद्ध वस्तीमध्ये युवकांचा आक्रोश अधिक अधिक वाढताना दिसत आहे.
नाल्यांचा उपसा केव्हा आणि कधी करणार यासाठी वार्डातील काही तरुण कार्यकर्त्यांनी कंबर कसलेली आहे.

