- सामाजिक आंदोलनाच्या दबावानंतर अनिल नगराळे अटकेत – पीडितेला न्याय”
- चंद्रपूर (प्रतिनिधी)
- विचारक्रांती न्यूज.
- संपादक.
- अनुप मेश्राम
- .चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नवेगाव येथे महिलांवर सातत्याने अत्याचार, धमक्या आणि मानसिक छळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध अखेर पोलिसांच्या मोठ्या कारवाई नंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
- अनेक दिवसापासून कायद्याच्या पळवाटा शोधणारा आरोपी अनिल अशोक नगराळे हा पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसी कारवाईमुळे त्या परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
- .अन्यायाने ग्रस्त असलेली पीडित महिला सौ. कविता भीमप्रकाश आकेवार यांच्या धाडसी पुढाकाराने व घेतलेल्या निर्णयाने गडचांदूर पोलीस स्टेशन मध्ये FIR नोंदविण्यात आले
- अनेक दिवसापासून आरोपी हा मोकाट फिरत असल्याने आरोपीच्या विरोधात नागरिकांने संताप व्यक्त केलेला आहे.
- या प्रकरणात विविध सामाजिक संघटना, स्थानिक नागरिक आणि विशेषतः *डॉ. समय्या पसुला (महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटना – संस्थापक अध्यक्ष)* यांच्या नेतृत्वाखाली
- आंदोलनाचा इशारा देताच व प्रशासनावर दबाव वाढताच अखेर पोलिसांना आरोपीच्या विरोधात कारवाई करणे भागच पडले.
- पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 74, 79, 115(2), 351(2), 3(5) अन्वये गुन्हे दाखल केलेले असून.अन्याय ग्रस्त महिलेला न्याय मिळालेला असून लढा अजून बाकी! आहे.
- आरोपीच्या अटकेनंतर पीडित महिला व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केलेले असले तरी, आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका समाजबांधवांनी मांडलेली आहे.

