Friday, March 27, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीजिल्हा रुग्णालय परिसरामध्ये अंधाराचे साम्राज्य !प्रशासनाच्या विरोधात रोष !

जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये अंधाराचे साम्राज्य !प्रशासनाच्या विरोधात रोष !

जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये अंधाराचे साम्राज्य !प्रशासनाच्या विरोधात रोष !

गडचिरोली. (विशेष प्रतिनिधी).

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम 

 विद्युत बिलाची सुमारे 04 कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या जिल्हा रुग्णालयावर विद्युत विभागाने वसुलीचा विडा उचललेला आहे.

विद्युत विभागाच्या कठोर निर्णयामुळे.  जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरामध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण झालेले असून .रुग्णालयातील कार्यरत अधिकारी. कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करताना दिसत आहेत.

विद्युत विभागानी घेतलेल्या कठोर निर्णयामुळे रुग्णालय परिसरातील कर्मचारी व अधिकारी यांचे निवास्थान अंधारमय अवस्थेत पडलेले असून. अंधाराचा फटका त्यांच्या कुटुंबीयांना व घरातील लहान मुलांना सोसावे लागत आहे.

अगोदरच रुग्णालय परिसर सांडपाणी. व घाणीने डबडबलेल्या अवस्थेत पडलेला असून. परिसरात अनेक जीवघेण्या डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कौटुंबिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही

जिल्हा शल्यचिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या निष्क्रिय व सुस्त प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे दिसून येत आहे.या गंभीर प्रकरणाची शासन दखल घेईल का,? 

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular