Sunday, August 23, 2026
Google search engine
Homeगडचिरोली.टी.ई.टी.परीक्षा अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकाकडे मुख्याध्यापकांचा पदभार!

.टी.ई.टी.परीक्षा अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकाकडे मुख्याध्यापकांचा पदभार!

.टी.ई.टी.परीक्षा अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकाकडे मुख्याध्यापकांचा पदभार!

गडचिरोली (प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज

संपादक

अनुप मेश्राम

नेहरू उच्च प्राथमिक शाळेतील कार्यरत प्रभारी मुख्याध्यापक सुधीर गोहने या प्रभारी मुख्याध्यापकानी अजून पर्यंत टी.ई.टी परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही

गडचिरोली नगर परिषद प्रशासनाने सुधीर गोहोणे यांच्या खांद्यावर मुख्याध्याप पदाची जबाबदारी टाकून भ्रष्टाचाराचे अनेक मार्ग मोकळे केल्याचे दिसून येत आहे.

नेहरू उच्च प्राथमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापका पेक्षा 8 शिक्षक. व शिक्षिका हे सेवा जेष्ठतेमध्ये मोडीत असताना सुध्दा.नगर परिषद प्रशासनाने अनुभवी व ज्येष्ठेत मोडत असणाऱ्या शिक्षकाकडे हेतुपुरस्सर व सूडबुद्धीने डोळे झाक करून सुधीर गोहोने यांच्या खांद्यावर शाळेची संपूर्ण जबाबदारी सोपवून कमाईचे अनेक मार्ग मोकळे केलेले आहेत..

मुख्याधिकारी तथा गडचिरोली नगर परिषद प्रशासनाने दिनाक 07.08.2025 ला ठराव मंजूर करून 4 शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी शिक्षन उपसंचालक नागपूर यांचेकडे 08.08.2025 च्या पत्रानव्ये शिफारस केलेली आहे.

परंतु टी.ई.टी.परीक्षा उत्तीर्ण नसल्यामुळे मा.न्यायालयाने आदेशान्वये मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी पात्र नसणाऱ्या शिक्षकांचे आदेश निर्गमित न केल्याचे दिसून आले. प्रभारी मुख्याध्यापक यांचेवर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप असताना नगर परिषद प्रशासन प्रभारी मुख्याध्यापक यांची पाठराखण करताना दिसत आहे 

नगर परिषद प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन त्रिसद्शीय चौकशी समिती त्वरित स्थापना करून व सबंधित प्रकरणाची मुद्देनिहाय सखोल चौकशी करून. दोषींवर कडक कारवाई करून प्रभारी मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव मडावी यांनी केलेली आहे..

 सदर प्रकरणाची सखोल चौकशी न केल्यास गडचिरोली नगरपरिषद प्रशासना पुढे धरणे आंदोलन करण्यात येईल.धरणे आंदोलनाची व होणाऱ्या न्यायालयीन खर्चाची संपूर्ण जबाबदारी ही नगरपरिषद प्रशासनावर राहील.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular