प्रभारी मुख्याध्यापक सुधीर गोहनेच्या विरोधात गुलाबराव मडावीने दिले 98 पानाचे सबळ पुरावे.
गडचिरोली,( प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम
गडचिरोली नगरपरिषद अंतर्गत जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेत 24 वर्षापासून एकाच शाळेत दडी मारून बसलेले. राजकीय आशीर्वाद पाठीशी घालून अनेक नियमबाह्य कामे करून शासनाची फसगत व दिशाभूल करणारे प्रभारी मुख्याध्यापक सुधीर गोहने यांच्या विरोधात माजी नगरसेवक. व सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव मडावी यांनी 98 पानाचे सबळ पुरावे सदर केलेले असुन त्यांच्या चौकशीची व फौजदारी कारवाई ची मागणी तक्रारीतून सुद्धा केलेली आहे.
गडचिरोली नागर प्रशासनाने सुधीर गोहने यांना पाठीशी घालून त्याची पाठराखण करीत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी नेते गुलाबराव मडावी यांनी जिल्हाधिकारी यांचे कार्यालयापुढे बेमुदत उपोष्ण करण्याचा इशारा सुधा दिलेला आहे
सुधीर गोहने या प्रभारी शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समितीला पाठीशी घालून गुलाबराव मडावी यांच्या विरोधात गडचिरोली पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवून स्वतःची भ्रष्ट पापे नगरपरिषदेच्या गटार गंगेत धुवून.पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे
तर गुलाबराव मडावी यां सामाजिक व आदिवासी नेत्यांनी 98 पानाचे लेखी पुरावे सादर करून प्रभारी शिक्षक सुधीर गोहने यांचा भ्रष्ट चेहरा जनतेपुढे आणलेला आहे.
यांच्या जागी एखादा अनुसूचित जातीचा व्यक्ती असता. तर लोकांनी व नगर परिषद प्रशासनाने राजकीय भांडवल निर्माण करून त्याची मानच मुर मुरडून टाकली असती.
तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी अनुसूचित जातीच्या एका अधिकाऱ्यावर सीडी विकल्याचे खोटे आरोप लावून त्यांच्या कडून नगरपरिषद प्रशासनाने 65 हजाराची रक्कम वसुली केली होती.

