उमरखेड बसचा भीषण अपघात ! युद्ध पातळीवर उपचार सुरू!
गडचिरोली. (विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
नवेगाव, मुरखडा या महामार्गावर झालेल्या भीषण अपघात दुर्घटनेत 30 प्रवासी गंभीर अवस्थेत सापडलेली असून.मुरखळा.,नवेगाव या गाव परिसरातील स्थानिक नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन अपघाती प्रवाशांना वाचवीण्यासाठी गावकऱ्यांनी कंबर कसली
अखेर बसच्या खिडक्या आणि दरवाज्यांची तोडफोड करून अनेक अपघाती प्रवाशांना मृत्यूच्या खाईतून त्यांना बाहेर काढावे लागले.
भीषणअपघातात जखमी झालेल्या 30 प्रवाशांना तात्काळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलेले असून. अपघाती प्रवाशांनवर वैद्यकीय पथकाकडून युद्ध पातळीवर उपचार सुरू केलेले आहेत.
सदर घटनेची तात्काळ माहिती मिळताच रूग्णालयातील कार्यरत्त डॉक्टर मनीष मेश्राम, डॉक्टर नागदेते .व रुग्णालयातील इतर डॉक्टरांनी सुद्धा .अपघाती रुग्णांना वाचवीण्यासाठी जीवापाळ शर्तीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत.

