कोरची सार्वजनिक बांधकाम उपविभाग चालते एकाच अभियंत्याच्या भरोश्यावर !
गडचिरोली (प्रतिनिधी )
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
कोरची येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग हे एकाच अभियंताच्या भरोशावर चालत असून या उपविभागातील कार्यरत दोन अभियंते अतुल अशोकराव वडिखाये शाखा अभियंता.तर प्रियेस कमलप्रसाद पारधी कनिष्ठ अभियंता हे दोन्ही बेपत्ता असलेले अभियंते एक कुरखेडा सार्वजनिक बांधकाम उपविभागात 4 वर्षांपासून
तर दुसरे अभियंनते आरमोरी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागामध्ये गेली 2वर्षापासून दडी मारून बसलेले आहेत.
कुरखेडा व आरमारी येथे कार्यरत असलेले हे दोन्ही अभियंते कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 01 यांच्या मर्जीतले व विश्वासातील असल्याचे सांगितले जात आहेत.
या दोन्ही अभियंत्यांचीकोरची परिसरात खमंग चर्चा होताना दिसत आहे. तर सा.बा उपविभागीय अभियंते फक्त मासिक बैठकीला. व पगाराची उचल करायला येत असल्याचे कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून संगीतले जात आहेत.
या दोन्ही अभियंत्यासहित सा. बा उपविभागीय अभियंत्यांची सुधा. कोल्हापूर. सोलापूर या परिसरात त्वरित हाकलपट्टी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अनुप मेश्राम. केलेली आहे.

