Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीमहिला व बाल रुग्णालयामध्ये ! महिला रुग्णांची गैरसोय

महिला व बाल रुग्णालयामध्ये ! महिला रुग्णांची गैरसोय

महिला व बाल रुग्णालयामध्ये ! महिला रुग्णांची गैरसोय

! गडचिरोली. (विशेष प्रतिनिधी.)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

गडचिरोली शहरातील मध्यवर्ती परिसरातील महिला व बाल रुग्णालयांमध्ये ग्रामीण व शहरी भागातून उपचारार्थ , व प्रसूतीसाठी भरती होण्यासाठी आलेल्या गरीब.,निराधार महिलांचा भरणा अधिका अधिक जाणवित असल्याचे दिसून येत आहे.

 तसेच भरती असलेल्या महिला रुग्णांची अतिशय गैरसोय सुध्दा होताना दिसत असून . महिलाच्या प्रसूतीकडे व गंभीर आजाराकडे सुध्दा हेतू परस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगितले जात आहे.

  महिलांची प्रसूती व प्रसूती काळात त्यांच्यावर वेळेवर उपचार होत नसल्यामुळे. प्रसूतीसाठी आलेल्या महिलाना रुग्णालयातील बेडवर ताटकळत पडून राहावे लागत असल्याचे महिलांकडून व त्यांच्या नाते वाहिकांकडून सांगितले जात आहे.

तसेच प्रसुतीसाठी भरती असलेल्या महिलाना रुग्णालयातील अपुऱ्या बेडच्या अभावी त्यांना जमिनीवर गादी टाकून झोपविल्या जाते.खाली टाकुण दिलेल्या गादीवर दोन ते तीन महिलाना एकसाथ ठेवले जात असल्याचे सांगितले जात आहे.

महिलांच्या प्रसूती वेदना काळात महिला रुग्णाची अतिशय कुचबना होत असताना सुद्धा महिला व बाल रुग्णालय प्रसासन महिलांच्या गंभीर बाबीकडे हेतुपुरसरपर दुर्लक्ष करताना दिसत आहे. 

महिला प्रशासनाने महिलांच्या गंभीर समस्याकडे जातीने लक्ष घालण्याची मागणी महिलांच्या नातेवाहिकानी सुध्दा केलेली आहे.

तसेच रुग्णालयात भरती असलेल्या बालकांचे (चिल्ड्रन वार्ड) हवाबंद असल्यामुळे व बालकांना मोकळी व खेळती हवा भेटत नसल्यामुळे रुग्णालयातील भरती असलेले बालक गुदमरून जात असल्याचे सांगितले जात आहे.

शॉर्टसर्किट.किंवा अनपेक्षित आग लागली तर. त्या आगीत एखादा बालक मृत्युमुखी पडला तर या गंभीर दुर्घटनेला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न महिला व महिलांच्या नातेवाहिकात उपस्थित होताना दिसत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular