फुले वार्डात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव.!
गडचिरोली ( दि.19मार्च )
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली शहरातील फुले वार्डातील मागास वर्गीयांच्या वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती निर्माण होताना दिसत आहे.
डासांच्या प्रादुर्भावात जीव घेणाऱ्या डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तसेच त्वचेच्या संसर्गाचे प्रमाण सुद्धा दिसून येत आहे.
वार्डात खुल्या नाल्या असताना हत्तीरोग या विभागा अंतर्गत गटारामध्ये व आजुबाजूच्या घर परिसरामध्ये फवारणी केली जात असायची.
परंतु 35 वर्षाच्या कार्यकाळात निवडून आलेल्या नगरसेवकांनी जुन्या गटारांची तोडफोड करून. नवीन गटारे तयार करून. पैसे कमविण्याचा गोरख धंदा सुरू केल्यामुळे. वार्डातील पैकबंध केलेल्या नाल्या आज जीव घेणाऱ्या डासांचे माहेरघर बनल्याचे दिसून येत आहे.
नगरपरिषद प्रशासनाने मागासवर्गीयांच्या वसाहतीमध्ये नित्यनेमाने फवारणी करून जीव घेणाऱ्या डासांचां प्रादुर्भावावर आडा घालण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनुप मेश्राम यांनी केली आहे.

