आंदोलनकर्त्यानची दिशाभूल ! चौकशी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी !
गडचिरोली ( विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
50 दिवसापासून .मूख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) वनवृत्त यांचे कार्यालयापुढे बेमुदत ठिय्या आंदोलन उभारून सुस्त प्रशासनाला झोपेतून जागे करण्याकरिता आंदोलनकर्त्यांनी उभारलेल्या ठिय्या आंदोलन कर्त्यांची फसगत व दिशाभूल करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर आंदोलन कर्त्यांनी कारवाईची मागणी केली.
वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांनी आपल्या पदाचा व सत्तेचा दुरुपयोग करून प्रशासनाला चुकीची माहिती देऊन ,व स्वतःचा बचाव व चौकशीमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
गौरव गणवीर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून उच्चस्तरीय आय.एफ.एस. अधिकारी व तक्रारकरते त्यांच्या उपस्थितीमध्ये सबंधित अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कामाच्या चौकशीची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
आंदोलन कर्त्यांनी तक्रारीची प्रत, मुख्यमंत्री, वनमंत्री,महाराष्ट्र राज्य.मुख्य वनसंरक्षण अधिकारी गडचिरोली यांना सादर सुद्धा सुध्दा केली.
आज मुख्य वनसंरक्षण यांच्या कार्यालयापुढे आडोलात्मक कार्यकर्त्यांचे ढोल आणि तासांच्या निनादात प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. असेच आंदोलन पुढेही सुरू ठेवण्याचा संकल्प आंदोलन कर्त्यांनी केला.

