
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयातील अभियंते उपअभियंते बेपत्ता!
गडचिरोली.(जिल्हा प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयातील कार्यरत अभियंते, उपअभियंते यांची कार्यालयात नेहमी अनुपस्थिती असल्याचे जाणवित असते. दिसतात फक्त यांच्या नावाच्या पाट्या
कार्यालयातील कार्यरत कर्मचाऱ्यांना अभियंते.उपअभियंते.यांच्या कार्या संबंधांत व जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या कामाबद्दल विचारणा केली असता. साहेब आत्ताच सीरोचा.भामरागडकडे रवाना झाले. असे सांगून.कार्यालयात कामानिमित्य आलेल्या व्यक्तींचा भ्रमनिरास होत असल्याचे कार्यालयात येणाऱ्या अनेक व्यक्तीकडून सांगितल्या जात आहे.
साहेबांचा संपर्क नंबराबाबत विचारांनी केली असता. साहेबांनाच विचार असे उडवा उडवीचे उत्तरे देऊन निरुत्साही केले जाते.
कार्यालयीन कार्यकारी अभियंते.उपअभियंते अभियंते हे जातात कुठे.काम कुठे करतात. यांच्या दैनदिन हलचाल नोंद रेकॉर्डची मागणी सामाजिक कार्यकर्ते. व पत्रकार अनुप मेश्राम यांनी केली आहे.

