Friday, June 5, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीजिल्हा रुग्णालय परिसरातील वृद्धावस्था वार्ड पडले वाऱ्यावर.!

जिल्हा रुग्णालय परिसरातील वृद्धावस्था वार्ड पडले वाऱ्यावर.!

जिल्हा रुग्णालय परिसरातील वृद्धावस्था वार्ड पडले वाऱ्यावर.!

गडचिरोली (दि 23में.)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम 

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात वृद्ध रुग्णाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून व सेवाभावी वृत्तीतीन साकारण्यात आलेले प्रशस्त वृद्धावस्था वार्ड आज वाऱ्यावर पडताना दिसत आहे.

 वृद्धवस्था वार्डमध्ये अनेक सोयींचा अभाव असून या वार्डामध्ये भेट देणारा डॉक्टर हा नाममात्र येत असून. वृद्धांच्या प्रकृतीची थातूरमातूर तपासणी करून आल्या पावलांनी परत जात असल्याचे सांगितले जात आहे.

दिवसा व रात्रीही त्यांचे चेहरेही दिसत नाही.नेमणूक केलेली सिस्टर ही दिवसही व रात्रीही बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.वृद्धांना पाहिजे तसा पोषक आधार सुधा दिला जात नाही. दिलेल्या पोषक आहारात चवसुधा दिसत नाही.

कूलर असून तो शोपिस ठरताना व धुडखात बंद अवस्थेत पडलेला आहे. पिण्याच्या पाण्याची गंभीर अवस्था असून वृद्धवस्था  वार्ड अनेक समस्याचे माहेरघर बनलेले असून .येथे भरती असणारा वृद्ध अतिश त्रस्त झालेले असून यांच्या पेक्षा स्वतःचे घरच बरे.अशा अनेक मरण यातना भोगणाऱ्या वृद्धांच्या मुखातून वेधले जात आहे.

आमच्या सदर प्रतिनिधीने वृद्धावस्था वार्डला  प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या व्यथा जाणण्याचा प्रयत्न केला असता   वृद्धावस्था वार्ड मध्ये दोन वयोवृद्ध महिला व एक वयोवृद्ध पुरुष असल्याचे दिसून आले.

तिन्ही वृद्ध सुटी करण्याच्या तयारीत असून. सबंधित डॉक्टरांनी अजूनपर्यंत त्यांना मुक्त सुध्दा केलेले नाही. ही आहे वृद्धावस्था वार्डची यशोगाथा. लाखो रुपये खर्चून  वृद्धांसाठी स्पेशल उभारलेले वृद्धावस्था वार्ड वाऱ्यावर पडताना दिसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular