Friday, June 5, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीप्रभारी मुख्याध्यापक सुधीर गोहोणे यांचे भ्रष्ट मुखवटे येणारं जनतेपुढे! त्रिसदस्यीय चौकशी समिती...

प्रभारी मुख्याध्यापक सुधीर गोहोणे यांचे भ्रष्ट मुखवटे येणारं जनतेपुढे! त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत!

प्रभारी मुख्याध्यापक सुधीर गोहोणे यांचे भ्रष्ट मुखवटे येणारं जनतेपुढे! त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत!

गडचिरोली.(वि.प्रति)

विचारक्रांती न्यूज

संपादक.

अनुप मेश्राम.

काही राजकीय लोकांचा व काही कथित नगरसेवकांचा आशीर्वाद पाठीशी घालून,आपल्या मनमर्जीने एकाच शाळेत 24 वर्ष आयुष्य घालवून राजेशाही थाटात जगू पाहणारे प्रभारी मुख्याध्यापक सुधीर गोहोणे. यांच्या प्रशासकीय कार्यकाळात केलेल्या वस्तू खरेदीच्या व बालकांच्या पाल्याकडून पावती रूपाने वसूल केलेल्या लाखो रुपयांचे भ्रष्ट प्रकरण उघडकीस येणार आहेत.

.या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी गडचिरोली जिल्हा नगर प्रशासनाने त्रिसदस्य चौकशी समिती गठीत सुध्दा केलेली  आहे.

प्रभारी मुख्याध्यापक सुधीर गोहोणे.या मुख्याध्यापकांनी चोवीस वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळात अजून पर्यंत.टी.ए.टी.परीक्षा  सुध्दा पासच केलेली नाही.तसेच बालकांचा हक्क व कायदा 2009 च्या नियमांचे उल्लंघन करून पालकांची दिशाभूल सुध्दा केलेली आहे.

या गठीत केलेल्या समिती मध्ये 1)श्री.आतिश बारासगडे.करनिरीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली.2)श्री.महेश गेडाम कार्यालय अधिक्षक नगरपरिषद गडचिरोली.3)श्री.प्रतीस मगर मुख्याधिकारी नगर परिषद धानोरा.या तीन्ही प्रशासकीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

अर्चना मेंढे जिल्हा सहआयुक्त नगर प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली. यांनी या तीन्ही सदस्यांना चौकशीचे त्वरित आदेश दिलेले आहे.हे विशेष.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular