जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये पत्रकारांना बंदी !
गडचिरोली,( विशेष प्रतिनिधी )
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम
गडचिरोली जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सबंधित कामानिमित्त भेटायला जाणाऱ्या पत्रकारांना जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी कार्यालयामध्ये प्रवेशबंदी घातल्याचे दिसून येत आहे.
.मृंद व जलसंधारणाचे काम करणाऱ्या सबंधित ठेकेदारांना त्वरित बोलावन त्यांचे सन्मानाने स्वागत केले जाते. पत्रकारांनी चिट्टी पाठवूनही तासंतास साहेबांच्या बोलविण्याची प्रतिक्षा करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.
कार्यालया अंतर्गत काम करणारे संबंधित ठेकेदार हे अधिकाऱ्यांना मालामाल करणारे असतात.तर पत्रकारही साहेबांचे लचके तोडणारे असल्यामुळे अधिकाऱ्यांच्या मनामध्ये पत्रकारांविषयी पोट तिडकतर नसेलना.!
जलसंधारण विभागाने स्थानिक कामांना महत्व न देता. दुर्गम व अतिदुर्गम भागातील एटापल्ली,. तालुक्यातील मरपल्ली.आरमारीतालुक्यातील,डोंगरगाव.सुकाळा,वडसा तालुक्यातील पोटगाव, कुरखेडा तालुक्यातील कढुली.बेलगाव, कोरची तालुक्यातील केमुल.वडसा, तालुक्यातील तुकम. कुरखेडा, तालुक्यातील खैरे.या गाव परिसरात नाला खोलीकरणाची आतापर्यंत अनेक कामे जिल्हा जलसंधारण विभागाने केलेली आहेत .
खोलीखरणांची ही कामे सबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील . व विश्वासातील ठेकेदारांना दिलेली असून या होत असलेल्या कामाच्या माध्यमातून.सबंधित अधिकारी मालामाल होताना दिसत आहेत.
जिल्हा जलसंधारण विभागाने ठेकेदारांच्या माध्यमातून केलेले नाला खोलीकरणांची कामे ही अतिशय निकृष्ट दर्जाचे असून काही दिवसातच भुई सपाट होण्याच्या मार्गावरती आहेत.शासनाचे करोडो रुपये व्यर्थ जाण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहेत.
जिल्ह्यातील विविध तालुका गावपातळीवर केलेल्या नाला खोलीकरणाच्या कामाच्या चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ता . व पत्रकार अनुप मेश्राम यांनी केलेली आहे.

