नेहरू उच्च प्राथमिक शाळेत नियमबाह्न नर्सरी सुरू ! ओळख पत्रासाठी 300 रुपये !
गडचिरोली (विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
नेहरू उच्च प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक सुधीर गोहने या प्रभारी मुख्याध्यापकांनी स्वतःचा आर्थिक फायद्या लाटण्याण्यासाठी.वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हितसबंध प्रस्थापित करून कुठलेही प्रशासकीय मंजुरी न घेता 2016.पासून नेहरू उच्च प्राथमिक शाळेत अनाधिकृतपणे नियमबाह्य नर्सरी सुरू केलीली आहे.
नेहरू उच्च प्राथमिक शाळेत जवळपास 800 विद्यार्थी शालेय शिक्षण घेत असून .प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांच्या पालकाकडून ओळख पत्रासाठी प्रत्येकी 300 रुपये वसूल करून व पालकांचे आर्थिक शोषण करून. प्रभारी मुख्याध्यापकानी या माध्यमातून बरीच माया जमविल्याचे तक्रारदारा कडून सांगितले जात आहे.प्रति 300 रुपये वसुल करीत असल्याची पावतीची झेरॉक्स प्रत तक्रारदाराने तक्रारी सोबत सुद्धा जोडलेली आहे.
दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश पुरवठा करण्याची तरतुद शासनाकडून केली जात असताना सुद्धा. प्रभारी मुख्याध्यापकानी पी.एम.सी. योजने अंतर्गत मिळालेल्या अनुदानातूनही आपल्या मन्मर्जीने गणवेशासाठी नियमबाह्य व अनावश्यक खरेदी करून आपले हात सुद्धा पिवळे केलेले आहे.
प्रभारी मुख्याध्यापकांनी केलेल्या नियमबाह्य गणवेश खरेदी तसेच दस्तऐवज.देयके .रोकडवही कोटेशन. स्टॉकबुक .शाळा व्यवस्थापन समितीचे ठराव इत्यादी बाबींच्या चौकशीची मागणी सामाजिक कार्यकत्ते गुलाबराव मडावी यांनी केली आहे.10.06.2025 झेरॉक्स प्रत सुध्दा सोबत जजोडलेली लेली आहे. हे विशेष.

