मृद व जलसंधारण विभागाछ्या प्रकाशित जाहिरात निवेदामध्ये प्रचंड भ्रष्टाचार!
गडचिरोली ( विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
जिल्हा मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत गडचिरोली येथे जाहिरात निविदेच्या माध्यमातून प्रकाशित केलेली मोठ्या रक्क मेच्या बंधाऱ्यांची कामे अचानक रद्द करण्यात आलेली असुन.त्या कामा ऐवजी नाला खोलीकरणा च्या नावावर दहा -दहा लाख रुपयांच्या आतिल कामांना मंजुरी दिली जात असल्याचे दिसून येत आहे.
मृंद व जलसंधारण विभागाचे संपूर्ण कामे ही नागपूर येथील आपल्या जवळच्या मित्राला दिली जात असल्याची कार्यालयीन परिसरात चर्चेला उधाण आलेले असून.ही संपूर्ण ,26.कामे कायद्याच्या विरोधात असल्याची खमंग चर्चा सुधा सुरू आहे.
गडचिरोली जिल्ह्यात काम करणारे आज अनेक कंत्राटदार काम करण्यासाठी तयार असताना सुद्धा ही सर्वच २६ कामे एकाच एजन्सीला कशी काय देण्यात आली हा एक चिंतनाची बाब आहे.
या कार्यालयीन कामाकरीता अधिकाऱ्यांच्या मन मर्जीतील तीनच कंत्राटदार असून.नोटीस बोर्डावर नोटीस न लावता व जिल्ह्यात खप नसलेल्या व कुणीही वाचत नसलेल्या साप्ताहिकाला व बाहेरील साध्य दैनिकाला जाहिरात देऊन आपल्याच ओळखीच्या मित्राला सर्वच कामे देऊन जिल्हा वार्षिक योजनांच्या पैश्याची उधळण होताना दिसत आहे. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारझाल्याची शक्यता नाकारता येत नाही.हे विशेष.

