कार्यकारी अभियंता साखरवाडे यांचे भ्रष्टाचारी पापे चव्हाट्यावर !
गडचिरोली.( विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 02 चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांनी आपल्या दोन तीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत केलेले रस्ता. व पुलियाची अनेक कामे ही निकृष्ट दर्जांचे केलेली असून . काही दिवसात ती संपूर्ण कामे भुईसपाट होण्याच्या मार्गावरती आहेत.
त्यांनी या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची माया कमविलेली असून.त्यांच्या विरोधातील आंदोलन आज रस्त्यावरती उतरलेले असून .सार्वजनिक बांधकाम विभागात उगारले एक बंडच म्हणावे लागेल.
या उफाळलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून व केलेल्या निकृष्ट कामाची व त्यांनी कमविलेल्या अवैध संपतीची व त्वरित त्यांच्या हकालपट्टीची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून चव्हाट्यावर येताना दिसत आहे.
साखरवाडे यांच्या विरोधात होत असलेले आंदोलन हे द्वेष भावनेतून की,? व्यक्तिगत हेतूतून ! या होत असलेल्या आंदोलनावर शहरातील अनेक सर्जनिक ठिकाणी खमंग चर्चेचा उधाण आलेले आहे.
या आंदोलनाला अनेक ठेकेदारांनी आप आपला पाठिंबा दर्शविलेला असून आज अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयापुढे डफड्यांच्या तोफ गुंजणार आहे. होत असलेले आंदोलन कितफत यशस्वी होते येणारा काळच ठरवेल . हे विशेष

