Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीकोटगल येथे राष्ट्रिय महामार्गा च्या नावावर होत असलेले नाली बांधकाम रामभरोसे !

कोटगल येथे राष्ट्रिय महामार्गा च्या नावावर होत असलेले नाली बांधकाम रामभरोसे !

कोटगल येथे राष्ट्रिय महामार्गा च्या नावावर होत असलेले नाली बांधकाम रामभरोसे!

कोटगल.(विशेष प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

कोटगल येथे राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने रस्ता रुंदीकरणाच्या नावावर होत असलेले दुतर्फा नालीबांधकाम हे मनमर्जीने व जोरजबारीने होत असल्याचे दिसून येत आहे.

नाली बांधकाम हे अतिशय निकृष दर्जाचे होत असून या बांधकामावर वापरण्यात येणारे साहित्य हे सुद्धा कमी दर्जाचे वापरले जात आहे तसेच होत असलेल्या नाली बांधकामावर पाण्याचा वापर सुधा केला जात नसल्याचे दिसून येत आहे.

 तसेच नाली बांधकाम करताना सबंधित विभागाने आजू बाजूच्या गावकरी लोकांना विश्वासात न घेता व त्यांना कुठलीही पूर्व सूचना न देता जोर जबरजस्तीने खोद काम व लगेच बांधकाम सुरू केलेले आहे .काही नाल्या वाकड्या तीकड्या स्वरूपांच्या केल्या जात आहेत. तर काही नाल्या लोकांच्या घरात घालून त्याची तोडफोड केली जात असल्याचे दिसून येत आहे.

यात काही लोकांचे आर्थिक नुकसान सुधा होत असल्याचे दिसून येत आहे तर काही लोकांचे तोंडबघून जागा सोडून काम केले जात असल्याचे पाहणीत दिसून येते आहे.

या होत असलेल्या नालीबांध कामावर आजुबाजूच्या गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली असून .होत असलेले नाली बांधकाम त्वरीत बंद करण्याची मागणी कोटगल गावातील अन्याय ग्रस्त लोकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular