Monday, June 15, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीऐश्वर्या सातपुते या महिला कनिष्ठ अभियंताची सा. बा.उपविभागात केली अतिरिक्त नियुक्ती.!

ऐश्वर्या सातपुते या महिला कनिष्ठ अभियंताची सा. बा.उपविभागात केली अतिरिक्त नियुक्ती.!

ऐश्वर्या सातपुते या महिला कनिष्ठ अभियंताची सा. बा.उपविभागात केली अतिरिक्त नियुक्ती.!

गडचिरोली. (विशेष प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम 

सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुरखेडा येथे गेल्या दोन वर्षापासून कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत असताना. तिथे कामाचा व्याप भरपूर असताना सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 01.व सा.बा.उपविभाग क्रमांक 02. या विभागातील संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या व्यक्तिगत स्वार्थ भावनेतून कनिष्ठ अभियंता ऐश्वर्या बाळासाहेब सातपुते या महिला कनिष्ठ अभियंताची सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 02 या विभागात हेतुपुरस्सर व नियोजनबद्ध पद्धतीने अतिरिक्त नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

तसा अतिरिक्त नियुक्तीचा आदेशही काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या महिला कनिष्ठ अभियंतेची सा.बा उपविभागात अतिरिक्त नियुक्ती होताच .या विभागातील संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांनी महिला अभियंताला पाठीशी घालून, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यलया अंतर्गत येणारी  रेव्हनि कॉलनी, गोडवाना विद्यापीठ, सर्कल ऑफिस, तसेच सा.बा.उपविभाग अंतर्गत येणारे अनेक महत्त्वपूर्ण कामाची जबाबदारी अभियंता ऐश्वर्या सातपुते यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

परंतु ही महिला कनिष्ठ अभियंता आपल्या अधिकार क्षेत्रखाली येत असलेल्या सबंधित कामाकडे हेतूपुरस्पर डोळेझाक करून आपल्या काचबंद कार्यालयीन क्याबींनमध्ये सतत बसून कामाचे इस्टिमेट बनविण्याच्या कामांत सतत व्यस्त असल्याचे सांगितले जात आहे.

सा.बा.उपविभागातील या अतिरिक्त महिला कनिष्ठ अभियंतकडे आज,10 ते 15= करोडो रुपये कामाची जबाबदारी त्यांच्या खाद्यावर टाकलेली असून.  त्याच सा. बा.उपविभागात कार्यरत असलेल्या महिला व पुरुष अभियंते हातावर हात मांडून कामच्या शोधात बसलेली असल्याचे दिसून येत आहे.

या विभागात महिला अभियंता कार्यरत असताना व ती अभियंता आपल्या कामात पारंगत असताना सुध्दा अतिरिक्त महिलेची काय आवश्यकता असे कार्यालयीन चर्चेला उधाण आलेले आहे.?

या महिलेची या विभागात अतिरिक्त नियुक्ती करण्यामागे सबंधित विभागाचा कोणता हेतू आहे. हे सबंधित अधिकाऱ्यांनाच माहित.! या संपूर्ण बाबीला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular