Friday, August 21, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीडोळ्यांच्या शस्त्रक्रिये नंतर दोन व्यक्तींना आले अंधत्व!  गडचिरोली नेत्रतज्ञ डॉक्टरांचा प्रताप!

डोळ्यांच्या शस्त्रक्रिये नंतर दोन व्यक्तींना आले अंधत्व!  गडचिरोली नेत्रतज्ञ डॉक्टरांचा प्रताप!

डोळ्यांच्या शस्त्रक्रिये नंतर दोन व्यक्तींना आले अंधत्व!  गडचिरोली नेत्रतज्ञ डॉक्टरांचा प्रताप!

गडचिरोली (विशेष प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या मल्लाजी आशांना येनगंटीवार राह. जारावंडी. तालुका एटापल्ली.तसेच दिवाकर गंगाराम भोयर राहणार कोटगल जि. गडचिरोली या दोन्ही व्यक्तींवर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात28.04.2026 ला डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. होती

Oplus_393248

या दोन्ही व्यक्तीच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर दोन ते चार दिवसांनी दोन्ही व्यक्तींच्या डोळ्याना त्रास होऊन डोळ्याची अतीशय गंभीर समस्या निर्माण होऊन डोळ्याना दिसेनासे झाले.

डोळ्यांच्या झालेल्या गंभीर समस्या जाणून घेण्यासाठी या दोन्ही व्यक्तीने दिनांक 04.06.2026  ला जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरकडे जाऊन दुसऱ्यांदा तपासणी करून घेतली.

 तपासणीनंतर डोळ्यात बसवण्यात आलेली लेन्स योग्य पद्धतीने बसवण्यात आलेली नसल्याचे काही डॉक्टरांकडून सांगितल्या गेले.

 सदर घडलेली हकीकत सांगण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकेसांची भेट घेतली असता. त्यांनी पुढील उपचारासाठी एम्स दवाखाना नागपूर येथे जाण्याचा सल्ला दिला.

अखेर दोन्ही व्यक्तींच्या डोळ्याना अतिशय होत असलेल्या वेदना सहन न झाल्यामुळे. अखेर  या दोन्ही व्यक्तींनी डचिरोली येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पलवार यांच्या खाजगी रूग्णालयात जाऊन दिनाक 11.07.2026 रोजी डोळ्यावर शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली.

डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या दोन्ही गरीब . व निराधार.व्यक्तींना अखेर स्वतःचे चाळीस हजार रुपये खर्चून आर्थिक भूदंड त्यांना सोसावा लागला.

डोळ्यांना अपंगत्व आलेल्या दोन्ही व्यक्तींनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची व संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याकडून नुकसान भरपाईची व सबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी सुधा लेखी निवेदनातून केलेली आहे.

निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्र फडवणीस उप पालकमंत्री रामदास जयस्वाल यांच्याकडे पाठवण्यात आली

 

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular