Wednesday, August 19, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीमहाश्रमदानातून रानखेळा येथे वनराई बंधारा.

महाश्रमदानातून रानखेळा येथे वनराई बंधारा.

गडचिरोली.(जिल्हा प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.

ग्रामपंचायत मौशिखांब मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत महाश्रमदानातुन मौजा रानखेडा येथील नाल्यावर दिनाक 20.11.2025 ला. वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले.

वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करतांना बंधाऱ्यात 270 सिमेंटचे खाली बॅग वापरण्यात आले,

रानखेडा येथील वनराई बंधारा बांधकाम करतांना रानखेडा येथील गावकऱ्यांनी. तसेच शिवाजी हायस्कूलचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक वर्ग व ग्राम पंचायत कार्यालयाचे संपूर्ण पदाधिकारी यांनी श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम केले.

यात मोशिखांब ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.रंजना दामजी पेंदाम ,नोडलअधिकारी श्रीमती. सिंधू घाडगे, बालविकास प्रकल्प अधिकारी, सौ.वर्षा तिवाडे. ग्रामपंचायत सदस्य, श्री गणेश धालकर.तंटामुक्ती अध्यक्ष,,श्री संतोष चौधरी. पोलिस पाटील रानखेडा,श्री.खुशाल नेवारे ग्राम पंचायत अधिकारी. शिवाजी हायस्कूल मौशिखांबचे मुख्याध्यापक, लडके.श्री.तोडसे सर, उसेंडी सर, खुशाल मडावी सर, रवी कुमरे. ज्ञानेश्वर ठाकरे.पाणी पुरवठा कर्मचारी, हेमंत मोंगरकर. रानखेडा येथील श्री लालाजी आवारी, चरण चौधरी, यादव चौधरी, श्री जीवन कुरुडकर व रानखेडा गावातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, कर्मचारी, व गावकरी यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधकाम करण्यात आले,

बंधाऱ्यामुळे शेतकरी, गावातील जनावरे. पाण्याची पातळी वाढण्याकरिता सुध्दा या वनराई बंधाऱ्याचा लाभ होईल असे मत सरपंच सौ. रंजना पेदाम व ग्राम पंचायत अधिकारी श्री. खुशाल नेवारे यांनी सुध्दा व्यक्त केले.

मुख्यमंत्री पंचायतराज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

गावकऱ्यांनी असेच श्रमदान करून.शासनाच्या अनेक योजनांमध्ये मोलाचे सहकार्य
करण्याची मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विचारातून व्यक्त केली.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular