Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीटि. बी. लॅबमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची हुकमतशाही,!

टि. बी. लॅबमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची हुकमतशाही,!

टि. बी. लॅबमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची हुकमतशाही,!

गडचिरोली (दि.19 डिसेंबर)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

टी.बी लॅब मध्ये कार्यरत असलेल्या दोन-चार कर्मचाऱ्यांची हुकुमतशाही अगदी शीगेला पोहोचलेली असून. हम करे सो कायदा.ही परिस्थिती टी . बी.लॅब मध्ये निर्माण होताना दिसत आहे.

रुग्णालयांमध्ये भरती असलेल्या रूग्णांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आजाराचे निदान काढण्यासाठी पाठवलेल्या रुग्णांला लॅब मधील कर्मचारी आजारी रुग्णांना योग्य मार्गदर्शन न करता रुग्णांना दारातच अडकवून व त्यांना दमदाटी देऊन त्यांना अस्पृश्य वागणूक दिली जात असल्याचे आजाराचे निदान करण्यासाठी गेलेल्या एका आजारी महिलेनी आपली व्यथा आमच्या सदर प्रतिनिधी पुढे व्यक्त केले.

आजारी महिलेने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या नावाची विचारणा केली असता.नावतर सोडा.तुम्ही आमची डी.डी.कडे तक्रार करा आम्ही आमचे पडुन पाहून घेऊ असेही मस्तीखोर भाष्य करू लागल्याची महिलेनी सांगितले..

तसेच टी .बी.लॅबची संपूर्ण जबाबदारी साळवे नावाच्या डॉक्टरांच्या अधिकार क्षेत्राखाली येत असल्याचे सांगितले जात आहे.या डॉक्टरांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्यामुळे रुग्णांना अस्पृश वागणूक दिली जाते.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular