Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीसिटीस्कॅन व एक्स-रे विभागात फिल्मचा तुटवडा.! दिला जातो कागदी रिपोर्ट!

सिटीस्कॅन व एक्स-रे विभागात फिल्मचा तुटवडा.! दिला जातो कागदी रिपोर्ट!

सिटीस्कॅन व एक्स-रे विभागात फिल्मचा तुटवडा.! दिला जातो कागदी रिपोर्ट!

गडचिरोली (दि.21डिसेंबर.)

विचारक्रांती न्यूज 

संपादक.

अनुप मेश्राम.

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील उपचारार्थ भरती असलेल्या रुग्णांच्या आजाराचे निदान काढण्यासाठी रुग्णांना पाठविलेल्या सिटीस्कॅन व एक्सरे विभागात बरेच दिवसापासून फिल्म उपलब्धच नसल्यामुळे रुग्णांना रुग्णांच्या समाधानासाठी कागदी रिपोर्ट दिली जात असल्याचे सांगितले जात आहे

कागदी रिपोर्टवरून रुग्णांच्या आजाराचे  खरे निदानच होत नसल्यामुळे  अनेक आजारी रुग्ण व  रुग्णांच्या नातेवाईकात  संभ्रम होत असल्याचे रुग्णांच्या नातेवाई काकडून सांगितले जात आहे.

जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन व एक्स-रे विभागात  जाणवित असलेला फिल्म तुटवड्याची त्वरित पूर्तता करून रुग्णांच्या सोयीसाठी फिल्म उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अनुप मेश्राम यांनी केली आहे.

तसेच नवनियुक्त जिल्हा शल्यचिकित्सकानी टेक्निशनच्या भरोशावर चालणारे दोन्ही  विभागाकडे जातीने लक्ष घालून या दोन्ही विभागात तज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीची मागणी सुद्धा अनुप मेश्राम यांनी केली आहे.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular