चामोर्शी शिक्षक सहकारी पतसंस्थेत लाखोंचा घोटाळा.! शिक्षक वर्गात तीव्र संताप.!चौकशीची मागणी!
गडचिरोली (विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
चामोर्शी प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्थेत लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळा झालेला असून.या संपूर्ण आर्थिक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सचिन कुलंसंगे सहित चाळीस शिक्षकांनी सहाय्यक निबंध सहकारी संस्था चामोर्शी यांच्याकडे लेखी तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे.
24 डिसेंबर 2025 पर्यंत शिक्षक सहकारी पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक करून शिक्षकांनी सखोल चौकशीची मागणी सुद्धा केलेली आहे.
लेखी दिलेल्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास दिनांक. 26 डिसेंबर २०२५ .पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संबंधी शिक्षकांनी दिलेला आहे. उपोषण कर्त्यांच्या जीवितास कमी जास्त झाल्यास या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी प्रशासकावर राहील असे लेखी निवेदनातून नमूद करण्यात आलेले आहे..
पतसंस्थेत झालेल्या आर्थिक घोटाळ्यामुळे च मोर्शी तालुक्यातील शिक्षक वर्गात संतापाची लाट उसळलेली असून .सहकार विभागाच्या होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

