मृतक दुर्योधन रायपुरे यांच्या मालकी शेतातून मुरमाची तस्करी,!
गडचिरोली ( विशेष प्रतिनिधी).
विचारक्रांती.
संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली शहरातील फुले वार्ड क्रमांक 2 मधील मृतक दुर्योधन रायपुरे यांच्या खरपुंडी येथील मालकी दोन एकर शेतातून मुरमाची तस्करी केल्याची खरपुंडी परिसरात चर्चा सुरू आहे.
मुरमाची तस्करी करणारे हे जे.सी.बी च्या माध्यमातून संपूर्ण शेत खोदुन, शेतामध्ये मोठ् मोठाले खड्डे खोदून शेत निकामी केल्याचे सांगितले जात आहे.
मुरमाची तस्करी करणारे हे गडचिरोली परिसरातील अट्टल तस्कर व गुन्हेगार प्रवृत्तीचे असल्याचे सांगितले जात आहे.
आगदी शेताला लागून असलेल्या व कुटुंबियांच्या सानिध्यात असलेल्या एका शेतमालकाची विचारणा केली असता. त्यांनीही आपले तोंड बंद केले असल्याचे दिसून आले .
अवैध मुरुम तस्करी मागे आजूबाजूच्या शेतमालकांचा हात तर नसेल ना असे खरपुंडी गाव परिसरात चर्चा होताना दिसत आहे .
दुर्योधन रायपुरे यांच्या निधनानंतर आज त्यांचा कुणीच वालीच नसल्यामुळे. त्यांच्या मृत्यूनंतर अनेकांनी संधीचे सोने करताना दिसत आहेत.
दोन एकर शेतातून लाखो रुपयांची मुरमाची तस्करी करणाऱ्या मुरुम तस्कराचा आता शोध घेणे सुरू आहे.

