जिल्हा रुग्णालयाचा अतिरिक्त पदभार डॉ. मनिष मेश्राम यांचेकडे सोपविण्यात यावे.. नागरिकांची ओरड.!
गडचिरोली ( विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचा अतिरिक्त शल्लचिकेसकाचा पदभार डॉक्टर मनीष मेश्राम यांच्याकडे सोपविण्याची मागणी.शहरातील अनेक जाणकार लोकांनी केलेली असून. नागरिकात तशी ओरड ही सुरू आहे..
डॉक्टर मनीष मेश्राम हे सुस्वभावी,.उत्साही, जबाबदार, व एक कर्तव्यनिष्ठ . अधिकारी म्हणून जिल्हा स्तरावर त्यांचा नावलौकिक आहे.
त्यांना प्रशासनाची अतिशय जाण असल्यामुळे अनेक दिवसापासून जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन आज सुरळीत सुरू आहे.
जिल्हा रुग्णालय प्रशासन सांभाळण्याची व प्रशासन पेलण्याची जबाबदारी डॉक्टर मनिष मेश्राम यांच्यामध्ये असल्यामुळे.आज त्यांच्या भरोशावर जिल्हा सामान्य रुग्णालयचा डोलारा जिवंत आहे.
एका अनुभवी, कर्तव्य दक्ष, .डॉक्टरला डावलून काही लोकांनी जिल्हा स्तरावर आपलीच परंपरा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
शासनाने व्यक्तीच्या योग्यतेचा व त्यांच्या कर्तबगारिचा विचार करून डॉक्टर मनीष मेश्राम सारख्या कर्तव्यदक्ष.जबाबदार व्यक्तीच्या खांद्यावर जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन देण्याची मागणी जिल्हास्तरावरील अनेक नागरिकांनी . केली आहे. व नागरिकात तशी ओरडही सुरू आहे.

