जिल्हा रुग्णालय परिसरात पसरली जीवघेणी दुर्गंधी,!
गडचिरोली. (वि.प्रतिनिधी )
विचार क्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली जिल्हा रुग्णालयाच्या आजू .बाजू परिसरातील संपूर्ण नाल्या घाणीने व सांड पाण्याने तुडुंब भरलेल्या असताना. या परिसरातील नाल्यांचा वर्षभर उपसाच होत नसल्यामुळे. रुग्णालय परिसरातील आजू बाजूला दुर्गंधीचा महापूर सर्वत्र पसरल्यामुळे .परिसरातील लोकांचे व नातेवाहिकांचे बेहाल होताना दिसत असून जीव नकोसा होताना दिसत आहे.
तसेच सबंधित ठेकेदारांनी रुग्णालय परिसरातील नाल्यांचे बांधकाम करताना. रस्त्यावरील टाकलेल्या गीट्टीची व बोल्डरची पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे. गट्टी.व बोल्डर नाल्यात पडून परिसरातील संपूर्ण नाल्या जाम झाल्यामुळे .नाल्यातील सांड पाणी बाहेर पडणे कठीण झालेले आहे
त्यामळे रुग्णालय परिसरातील वसाहतीमध्ये जीवघेणी दुर्गंधी सभोवताल पसरताना दिसत आहे.
या जीवघेण्या दुर्गंधीला जिल्हा रुग्णालय प्रशासन व सार्वजनिक बांधकाम प्रशासना हेच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.
या गंभीर बाबीकडे दोन्ही विभागातील प्रशासनाने जातीने लक्ष घालून रुग्णालय परिसरातील दुर्गंधीचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनकडून केली जात आहे.
.

