Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीजेप्रा येथे सुवर्ण प्राशन शिबिराचे यशस्वी आयोजन; ३३ बालकांना मिळाला लाभ* 

जेप्रा येथे सुवर्ण प्राशन शिबिराचे यशस्वी आयोजन; ३३ बालकांना मिळाला लाभ* 

*जेप्रा येथे सुवर्ण प्राशन शिबिराचे यशस्वी आयोजन; ३३ बालकांना मिळाला लाभ* 

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आरोग्य सुविधांचे बळकटीकरण. 

गडचिरोली(दि. 27मार्च ) 

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम

जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा यांचे मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या सूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात आयुर्वेद आणि आधुनिक प्रशासनाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून जेप्रा येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर (आयुष) येथे ‘सुवर्ण प्राशन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये ३३ बालकांना सुवर्ण प्राशनचा डोस मोफत देण्यात आला.

जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) निधीचा प्रभावी विनियोग* 

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील बालकांचे आरोग्य सुदृढ व्हावे, या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) निधीतून सर्व ‘आयुष’ आरोग्यवर्धिनी केंद्रांसाठी सुवर्णप्राशन औषध खरेदी करण्यात आले आहे. या निधीचा वापर करून ग्रामीण स्तरावर आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे.

*रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘सुवर्ण प्राशन’ वरदान* 

शिबिरादरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रगती टाक यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “६ महिने ते १६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी सुवर्ण प्राशन अत्यंत गुणकारी आहे. यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनशक्ती सुधारते आणि बौद्धिक क्षमतेचा विकास होतो.”

उपस्थित मान्यवर आणि कर्मचारी* 

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जेप्रा येथील आरोग्य सेविका श्रीमती शालिनी पराते, औषधी निर्माण अधिकारी अश्विनी दूरशेट्टीवार, आरोग्य केंद्रातील आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका यांनी मोलाचे सहकार्य केले.

जिल्हा आरोग्य विभागाने आवाहन केले आहे की, पालकांनी आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या सुवर्ण प्राशन मोहिमेचा लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करा.

 (डॉ प्रताप शिंदे )जिल्हा आरोग्य अधिकारी.जिल्हा परिषद गडचिरोली

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular