साखेरा ग्रामपंचायत आमसभे मध्ये तरुणांनी केली वस्तू खरेदीवर चर्चा!
गडचिरोली. (प्रतिनिधी.)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
05 जून नंतर 12 जूनला झालेल्या साखेरा ग्रामपंचायतच्या आमसभेमध्ये ग्रामपंचायतीने खरेदी केलेले वॉटरकूलर.आरो खरेदी.तसेच विद्युत तार.आणि दोन विद्युत खांब यांच्यावर जोरदार चर्चा करण्यातआली
.या चर्चेत विपुल बघेल यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.त्यांनी केलेल्या प्रश्नाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले. नियमावली वर बोट ठेवण्यात आले
आमसभेमध्ये खरेदी केलेल्या वस्तूवर संबंधीत ग्रामसेवक आणि सरपंच यांनी कोणतेच उत्तर न देता उलट गावकऱ्यांना पाठीशी घालण्यात आले.
विपुल बघेल , हरिश्चंद्र बर्लावर .निखिल मडावी यांचेवर दबाब टाकण्याचा प्रयत्न करून ग्रामसभेची व गावकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली.
खरेदी केलेल्या वॉटर कुलर.व आरो यांचे दुकानातून खरेदी केलेले बिल सुद्धा दाखवण्याचे सबंधित ग्रामसेवकांनी धाडस सुधा दाखविले नाही.
दोन्ही खरेदी केलेल्या वास्तूचे बिल बाजारपेठेपेक्षा जास्त किमतीचे असल्याने ग्रामसभेने खरेदी केलेल्या वस्तूवर तरुणांनी संशय व्यक्त केलेला आहे.
.

