सुसज्ज जिल्हा रुग्णालयात कुशल सर्जनचा अभाव.!
गडचिरोली.(जि. प्रतिनिधी.)
विचारक्रांती न्यूज.
संपादक
अनुप मेश्राम.
गडचिरोली सारख्या सुसज्ज. व अनेक सोयियुक्त जिल्हा रुग्णालयां मध्ये शस्त्रक्रिया करणाऱ्या कुशल सर्जनचा अभाव दिवसेंदिवस अनेकांना जाणवित असल्यामुळे उपचारार्थ भरती असलेल्या जिल्ह्यातील व गाकुसाबहेरील कित्येक गरीब..निराधार. व परिस्थितीने लाचार असलेल्या रुग्णांना उपचारासाठी नागपूर सारख्या ठिकाणी हलवल्या जात असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून सांगितले जात आहे.
अगोदरच परिस्थितीने कमजोर वलाचार रुग्णांवर उपचारापेक्षा लादलेली जोर जबरदस्तीने रुग्णांचे बेहाल होताना दिसत आहेत.
रुग्णांना उपचारार्थ बाहेर हलविण्यापूर्वी रुग्णावर आणि त्याच्या प्रकृतीवर कुठलेही वैद्यकीय उपचार व कुठलीही चिकित्सा न करता भरती असलेल्या रुग्णाला जबरदस्तीने नागपूर सारख्या मोठ्या शहरात रेफर करून व स्वतःवरील लादलेले ओझे झटकून आर्थिक संकट रुग्णावर लादले जाते. असल्याचे त्यांच्या नातेवाहिकांकडून सांगितले जात आहे.
सोयी सुविधाने सुसज्ज असलेला. व नव्याने सुरू झालेल्या मेडिकल कॉलेजमध्ये कुशल सर्जन शोधूनही सापडत नसल्यामुळे खरोखर सर्व सामान्य जनतेचे दुर्भाग्यचे म्हणावे लागेल.
गडचिरोली सारख्या मागासलेल्या व सुसज्ज असलेल्या जिल्हा रुग्णालयामध्ये माणुसकी जोपासणारे व रुग्णाच्या हाकेला धावुन जाणाऱ्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांना आशेचा किरण दाखवणारा कुशल सर्जनची आज जिल्हा सामान्य रुग्णालयात नितांत गरज असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णांच्या नातेवाहिका कडून मागणी होत असल्याचे दिसून येत आहे.

