गडचिरोली मृंद व जलसंधारण कार्यकारी अभियंत्यांनी दिला खोटा चौकशी अहवाल.!
गडचिरोली.(विशेष प्रति)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली मृद व जलसंधारण कार्यकारी अभियंता श्री.अमित..राऊत.व अहेरी येथील मृंद व जलसंधारण उपविभागीय अधिकारी श्री. पी. जे. पूल्लवार यां दोन्ही अधिकाऱ्यांच्या संगनमताने एटापल्ली.अहेरी. भामरागड.सिरोंचा.या तालुक्यांमध्ये यांचे कार्यालया अंतर्गत एकूण 23 कामे मंजूर झालेली होती .
परंतु मंजूर झालेल्या 23 कामापैकी एकही कामे न करता. सिग्मा कन्ट्रक्शन कंपनीला .एटापल्ली तालुका अंतर्गत 01कोटी 25 लाख रुपयांचे देयके .तर अहेरी.भामरागड. सिरोंचा तालुका अंतर्गत 01 कोटी 17 लाख रुपयांचे देयके देण्यात आलेली होती.
या दोन्ही अधिकाऱ्यांच्या संगनमताने केलेली भ्रष्ट पापे जिल्हा प्रशासनापुढे आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनुप मेश्राम यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली व मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यांना दिनाक 09/06,/2026, ला एक लेखी तक्रार देवून सबंधित झालेल्या भ्रष्ट कामाच्या चौकशीची मागणी तक्रारीच्या माध्यमातून केली होती.
गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीची लगेच दखल घेऊन .मृदू व जलसंधारण अधिकारी गडचिरोली. यांना चौकशी संदर्भात एक लेखी पत्र पाठवून संबंधित विभागाला. व सबंधित तक्रारदाराला चौकशी अहवाल देण्याचे सूचित केले होते
संबंधित मृदु व जलसंधारन विभागाने एटापल्ली.अहिरी भामरागड. सिरोंचा या तालुक्या अंतर्गत मागितलेल्या 23 कामाची स्वतः कुठलीही चौकशी न करता.गडचिरोली तालुका स्तरावर झालेले 10 कामे दाखवून तक्रारदाराला व संबंधित जिल्हा प्रशासनाला खोटा अहवाल सादर करून तत्कालीन कार्यकारी अभियंता व उपविभागीय अधिकारी पूल्लवार यांची पाठराखण सुध्दा केलेली आहे.
तसेच सबंधित विभागाने तत्कालीन अधिकारी राऊत यांची बदली झाली असताना सुध्दा. नव्याने रुजू झालेले कार्यरत कार्यकारी अभियंता यांनी स्वतः पुढाकार न घेता . तत्कालीन कार्यकारी अभियंता राऊत यांचाच नावाने चौकशी अहवाल सादर करून स्वतःचे हात झटकून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे.हे विशेष ( क्रमस)

