फुले वार्डात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांपेक्षा मृतक दुर्योधन रायपुरे यांच्या नावाची चर्चा!
गडचिरोली.( जिल्हा प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
निवडणुकीचे वारे जोरात घोंघावू लागलेले आहेत. राजकीय चर्चेला सर्वत्र उधाण आलेले आहे. प्रत्येक वार्डातील मतदार राजकीय चर्चा चवीने करतांना दिसत आहे.
फुले वार्ड क्र.2 ते फुले वार्ड क्र. 3 मध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या जागेवर उमेदवार आपले भविष्य घडवून आणण्यासाठी वार्डातील मतदारांसी अहोरात्र संपर्क साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत
अनुसूचित जातीच्या आरक्षित जागेवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांपेक्षा मृतक दुर्योधन रायपुरे यांच्या नावाची व त्यांनी वार्डामध्ये केलेल्या विकासात्मक कामाची आणिशहरातील जनसामान्य लोकांना मिळवून दिलेल्या न्याय हक्काची खमंग चर्चा होताना दिसत आहे.
वार्ड नंबर 2 ते वार्ड नंबर 3 मध्ये अनेक राजकीय पक्षांच्या कुबड्या घेऊन निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी मतदारांना विकासाचे कितीही गाजर दाख विले असले तरी उमेदवारांच्या शब्दांवर विश्वासच नसल्याचे खुले आम मतदारात बोलले जात असल्याचे दिसून येत आहे.
आज दुर्योधन नावाची व्यक्ती जिवंत असती तर त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या गळ्यात नगरसेवकांची माळ टाकून त्यांना विजयश्री प्राप्त करून देण्याची ताकद वार्डातील प्रत्येक उमेदवा रात बोलून दाखव विल्या जात आहे आणि हे सूर्य प्रकाशासारखेअगदी सत्य आहे.

