शालिनीताई भोपये, प्रकाश ताकसांडे यांच्या प्रचार कार्याला व गाठी भेटीला उत्तम प्रतिसाद!
गडचिरोली( विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
विदर्भ महामंच आघाडी व जय विदर्भ पार्टीचे अधिकृत उमेदवार गुरुदेव भोपये. तसेच प्रभाग क्र.१३ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शालिनीताई भोपये व प्रभाग क्रमांक ७ चे अपक्ष उमेदवार प्रकाश ताकसांडे यांच्या प्रचार कार्याला व मतदारांशी घेत असलेल्या गाठी भेटीला मतदार संघातील मतदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.
सदर तिन्ही उमेदवार हे स्वतंत्र बाण्याचे व स्वतंत्र विचाराचे असून.या तीन्ही उमेदवारानी आपली संपूर्ण ताकद प्रचार कार्याला वाहून घेतलेली आहे.
तसेच या तिन्ही उमेदवारांनी आपला संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला असून. या तीन्ही उमेदवारांना मतदारांनी विजयाची भरभरून हमी सुध्दा दिलेली आहे.
उमेदवारांच्या वाढत्या प्रचाराने व प्रभावाने काही प्रस्थापित उमेदवार धास्तावलेले असून यांना मोठ मोठाली प्रलोभने दाखविले जात असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.
पडलो तरी चालेल पण कुणा पुढे नतमस्तक होणार नाही असे तीन्ही उमेदवाराने मनाशी निष्ठेची मूठगाठ बांधलेली आहे.

