गॅसएजन्सी मध्ये गॅससिलेंडरचा तुटवडा! ग्राहकांचा आक्रोश!
गडचिरोली (विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली शहरांतील गॅसएजंसी मध्ये घरगुती सिलेंडरचा तुटवडा अतिशय निर्माण होत असल्यामुळे. घरगुती गॅससिलेंडर महिलांसाठी एक डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
गॅस एजन्सीने घरगुती सिलेंडरचा मोठा तुटवडा दाखवून शहरांतील काही मर्जीतील व्यवसायिक दुकानदारा कडून दुपटीने पैसे मोजून व्यावसायिकांना सिलेंडर मोठ्या प्रमाणात पुरवल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.
ही गंभीर बाब प्रशासनाच्या नजरेमध्ये येत असताना सुद्धा प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.सिलेंडर ग्राहकांना एजन्सी पुढे तासंतास उभे राहून एजंसी धारकांची ग्राहकांना मनधरणी करावी लागत आहे.
प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष वेधून सिलेंडर धारकांना होणारा मानसिक त्रास दूर करन्यायाची मागणी सिलेंडर धारका कडून केली जात आहे.

