Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीव्याहाळ नदीघाट हायवे परिसरात ट्रॅफिक पोलिसांचा मनमानी कारभार!

व्याहाळ नदीघाट हायवे परिसरात ट्रॅफिक पोलिसांचा मनमानी कारभार!

व्याहाळ नदीघाट हायवे परिसरात ट्रॅफिक पोलिसांचा मनमानी कारभार!

गडचिरोली ( विशेष प्रतिनिधी.)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड नदीघाट परिसरातील हायवे रोडवर धरपकड करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांचा मनमानी कारभार अगदी शिगेला पोहचलेला असून. हम करे सो कायदा ही परिस्थिती ट्रॅफिक पोलिसांनी निर्माण केलेली आहे.

या हायवे मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या टू.व्हिलर गाड्यांची तपासणी करताना ट्रॅफिक पोलिसांनकडून काही टू.व्हिलर गाड्यांनची तपासणी न करता त्यांना सोडून दिल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.तर काही गाडी चालकावर 500 रुपयांची चालान फाडून त्यांना मुक्त केले जात आहे.

आपल्या भावाच्या अंत्यविधीला जात असलेल्या  टू व्हिलर गाडी चालकाकडे लायसन्स.गाडीला नेंपलेट असताना सुद्धा टू.व्हिलर गाडी पुराणी असे दाखवून गरीब, निराधार व्यक्तीवर साडेतीन हजार रुपयांची चालन फाडली गेल्याचे एका अन्याय ग्रस्त गाडी चालकांनी आपले मनोगत आमच्या सदर प्रतिनिधी जवळ व्यक्त केलेले आहे.

तर काही गाडीचालक चिरीमिरी देऊन स्वतःची सुटका करून घेत असल्याचे सांगितले जात आहे.ट्रॅफिक पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे अनेक टू व्हिलर गाडी चालक त्रस्त होताना दिसत आहेत. 

गाव खेड्यातून शहरात रोजी रोटी साठी निघालेले काही पोटभरू मजुरांकडे कागदपत्राची पूर्तता नसल्यामुळे ट्रॅफिक पोलिसांची दहशत थांबेपर्यंत अकरा ते बारा वाजेपर्यंत रस्त्याच्या कडेला थांबून स्वतःच्या रोजी रोटीला मुकावे लागत असल्याचे त्या परिसरातील मजुरात बोलले जात आहे.

ट्रॅफिक पोलिस गरीब. निराधार अशाच लोकांच्या गाड्यांनची चालन करतांना दिसतात.राजकारणी श्रीमंत. व्यापारी.दारू पुरविनाऱ्या दलालांच्या  गाड्याची कधीही चालन करताना दिसत नाही.

शहरांमध्ये अनेक काड्या पिवळ्या गाळ्या आज जीर्ण अवस्थेत शहरांमध्ये धावत असताना सुद्धा .ट्राफिक पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.

ट्रॅफिक पोलिसांना फक्त गरीब आणि निराधार लोकांच्या त्यांना दिसतात गाड्या तसेच मोबाइल मध्ये सेवकेलेले कागदपत्रे  ग्राह्य मानायला तयार नाही.त्यांना  हवे असतात ओरिजनल कागदपत्रे.उद्या गहाळ जर झाले तर याला जबाबदार कोण?

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular