Saturday, June 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedवन तस्करानवर वनविभागाची धाड ! वनतस्कर फरार!

वन तस्करानवर वनविभागाची धाड ! वनतस्कर फरार!

वन तस्करानवर वनविभागाची धाड ! वनतस्कर फरार!

चमोर्शी ( प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

 

आलापल्ली वनविभागा अंतर्गत येत असलेल्या, घोट वनपरिक्षेत्रातील विकासपल्ली उपक्षेत्राच्या हद्दीमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. नलेश्वर वाडीघरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यासोबत रात्रीच्या सुमारास जंगल परिसरात ग्रस्त  घालित असताना. पहाटे 3 च्या सुमारास अवैध रित्या  वन तस्कर लाकडांची तस्करी  करीत   असल्याचे  निदर्शनात आले.

तस्करांच्या वाहनाची तपासणी केली असता. तपासणी अंतर्गत सागवान प्रजातीची 13 नग आढळून आल्याचे दिसून आले. 

तपासणी दरम्यान तस्करांनी स्वतःचा बचाव करण्याच्या दृष्टिकोनातून जंगल परिसरातून पळ काढून फरार झाल्याचे सांगितले जात आहे.

अवैध वृक्षतोड प्रकरणाचा तपास श्रीमती. दीपाली तलमले उपवनसंरक्षक वनविभाग आल्लापल्ली.मोहम्मद आझाद प्रकास्ट नीष्कासन अधिकारी वनविभाग आलापल्ली. यांचे मार्गदर्शनाखाली श्री. निलेश्वर वाडीघरे वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग घोट यांच्या मार्फत अधिक तपास करीत असल्याचे सांगितले जात आहे.

आल्लापल्ली वनविभागा अंतर्गत अवैध वृक्षतोड, वन्यप्राणी शिकार व इतर वनगुन्हे या बाबत माहिती मिळाल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी घोट. व त्या विभागातील सबंधित कर्मचारी यांना योग्य माहिती देण्यात यावी असे आव्हान नागरिकांना करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular