Saturday, June 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्राथमिक आरोग्य केंद्रातील ॲम्बुलन्स वापरतात खाजगी कामासाठी.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील ॲम्बुलन्स वापरतात खाजगी कामासाठी.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील ॲम्बुलन्स वापरतात खाजगी कामासाठी.

आष्टी.(विशेष प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या, आदिवासी रुग्णांच्या सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध करून दिलेली ॲम्बुलन्सचा सतत दुरुपयोग होत असून .ही ॲम्बुलन्स रुग्ण सेवेसाठी वापरल्या जात नसून रुग्णालयात कार्यरत असलेले शिपाई, हे आपल्या घरगुती खाजगी कामासाठी वापर करीत असल्याचे दिसून येत आहे.

प्राथमिक आरोग्यकेंद्र प्रेमिलीची असीच एक ॲम्बुलन्स प्रेमिली आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले शिपाई सायंकाळी अंदाजे 5 ते 5.30 च्या सुमारास कडोली चौकामध्ये आणून ठेवीत असल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे .

ॲम्बुलन्सचा उपयोग कधी पार्टीसाठी.तर कधी देव दर्शनासाठी केले जात असल्याच सांगितले जात आहेत .

प्राथमिक स्तरावर ॲम्बुलन्स ही रुग्णसेवेसाठी अत्यंत गरजेची असतान सुध्दा .शिपाईच्या दुरुपयोगामुळे अल्पवयीन आदिवासी बालकांचा जीव जात आहे .तर आलदांडी टोला सारख्या आदिवासी गावातील महिला मृत्यूला बळी पडल्या जात आहेत. दुर्गम भागातील असे अनेक निष्पाप जीव मृत्यूला कारणीभूत ठरले जात आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर उपलब्ध असलेली ॲम्बुलन्स ही रुग्णांना वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे आदिवासी भागातील गोरगरीब निष्पाप रुग्णांचा जीव जात आहे.

होत असलेल्या मृत्यूला जबाबदार कोण ? अशी ग्रामीण स्तरावर ओरड होताना दिसत आहे.संबंधित शिपाई यांची चौकशी करून यांचेवर निलंबनाची कारवाई करतील का?

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular