Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीकंट्रोलचा तांदूळ विकल्या जातो मार्केटमध्ये 20 रुपये किलो. भावाने!

कंट्रोलचा तांदूळ विकल्या जातो मार्केटमध्ये 20 रुपये किलो. भावाने!

कंट्रोलचा तांदूळ विकल्या जातो मार्केटमध्ये 20 रुपये किलो. भावाने!

गडचिरोली.(वि. प्रतिनिधी )

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

स्वतःच्या परिस्थितीचे प्रदर्शन मांडून व आपले नाव बी.पी.एल , अंत्योदय सारख्या योजने मध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी प्रशासनाशी हात मिळवणी करून या दोन्ही योजनेच्या माध्यमातून पाच ते दहा एकरचे शेतकरी मध्यमवर्गीय. व शासकीय नोकरदार सुद्धा या योजनाच्या माध्यमातून शासनाच्या अनेक योजनाचा फायदा लाटताना दिसत आहेत

शहरातील.मध्यम शेतकरी. शासकीय नोकरदार सुद्धा रेशन दुकानातुन फ्री मध्ये मिळनाऱ्या गहू , तांदळाची उचल करून रेशनचा फ्री मध्ये मिळणारा  गहू, तांदुळ  स्वतः खाण्यासाठी उपयोग न करता. मिळणारा तांदूळ आणि गहू मार्केटमध्ये प्रति वीस रुपये किलो या भावाने विकल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

काही आंबट शौकीन ग्राहक , फ्री मध्ये उचल केलेला तांदूळ किरकोड व्यापाऱ्यांना विकून वआलेल्या  रकमेत स्वता जवळील काही किरकोळ रक्कम टाकून 35 ते 40 रुपये किलो प्रति भावाने विकत घेऊन त्या तांदळाचा उपयोग  खासण्यासाठी करताना दिसत असतात 

ग्राहकांना फ्री मध्ये मिळणारे तांदूळ. गहू  खुलेआम बाजारातील  काही किरकोळ व्यापाऱ्यांना विकत असताना व प्रशासनाला या बाबीची जाणीव असताना सुद्धा प्रशासन या गंभीर बाबीकडे डोळे झाक करताना दिसत आहे.

रेशन दुकानातील तांदूळ किरकोळ व्यापाऱ्यांना विकणाऱ्या ग्राहकाचा रेशन कार्ड खरोखर बंद करतील का,? अश्या ग्राहकांचे रेशनकार्ड बंद करण्याची धम्मक प्रशासनात आहे का? असे अनेक  प्रश्न जनसामान्य लोकात चर्चिले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular