अरुणोदय’ सिकलसेल अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
गडचिरोली.(दि. 22 जानेवारी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
मा. नामदार आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर यांचे संकल्पनेतून सार्वजनिक आरोग्य विभाग अरुणोदय सिकलसेल विशेष अभियान दिनांक 20 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यात राबविल्या जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात ‘अरुणोदय सिकलसेल विशेष अभियानाला’ सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १५ जानेवारीपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत आतापर्यंत हजारो नागरिकांनी आपली सिकलसेल चाचणी पूर्ण केली असून, गावोगावी आरोग्य शिबिरांना नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
लोकसहभागातून अभियान यशस्वी:
जिल्ह्यातील दुर्गम भागांपासून ते शहरांपर्यंत सर्वच ठिकाणी तरुण, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांनी या मोहिमेत हिरिरीने सहभाग घेतला आहे.
अनेक ठिकाणी ग्रामसभांमध्ये सिकलसेल जनजागृती करण्यात येत असून, आरोग्य पथकांद्वारे घरोघरी जाऊन समुपदेशन केले जात आहे. मिळणारा हा प्रतिसाद पाहता, गडचिरोली जिल्हा सिकलसेल मुक्तीच्या दिशेने वेगाने पाऊल टाकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आपणही सहभागी व्हा!
हे अभियान ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. ज्या नागरिकांनी अद्याप आपली किंवा आपल्या पाल्यांची तपासणी केलेली नाही, त्यांनी तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपकेंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी.
अरुणोदय अभियानाचे यश हे केवळ आरोग्य विभागाचे नसून ते जिल्ह्यातील प्रत्येक सजग नागरिकाचे आहे. सिकलसेल हा आजार मुळापासून संपवण्यासाठी १०० टक्के स्क्रीनिंग होणे गरजेचे आहे. ज्यांना अद्याप आपली आरोग्य स्थिती (Status) माहित नाही, त्यांनी तपासणी करुन घ्यावी,
आपल्या एका चाचणीमुळे भविष्यातील पिढीचे आरोग्य सुरक्षित होऊ शकते. तरी, उर्वरित काळात जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन ‘सिकलसेल मुक्त गडचिरोली’च्या संकल्पात आपले योगदान द्यावे,”
असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.
सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये चाचणीची सोय,तपासणी पूर्णपणे मोफत आहे,
आरोग्य कार्ड: तपासणीनंतर तात्काळ सिकलसेल स्टेटस कार्ड दिले जात आहे.चला, आपण सर्व मिळून ‘अरुणोदय’ अभियानात सहभागी होऊया आणि सिकलसेलला हद्दपार करूया असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली श्री सुहास गाडे यांनी केले आहे.
डॉ प्रताप शिंदे.
(जिल्हा आरोग्य अधिकारी.)
जिल्हा परिषद, गडचिरोली.

