दुर्गम भागातील जारावंडी गाव विकासापासून वंचित! विकासकामाला ग्रामसेवकच जबाबदार.
पेंढरी.( विशेष प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जारावंडी हे गाव अनेक दिवसापासून विकासकामा पासून कोसो मेल दूर असून.गाव विकासकामाला कार्यरत ग्रामसेवकच हेच जबाबदार असल्याचे गावकऱ्यात बोलले जात आहे.
कार्यरत ग्रामसेवक हा आपल्या मुख्यालयाला कधीच राहाताना दिसत नाही.महिन्यातून.पंढरवाड्यातून.एकदाच मुख्यालयाला येऊन व गावकऱ्यांना आपले तोंड दाखवून व इतर शासकीय कामाचे बहाणे सांगून आल्या पाऊलाणी गावाकडे निघून जात असल्याचे गावकऱ्यात बोलले जात आहे.
कार्यरत ग्रामसेवकाच्या निष्क्रिय.बेजबाबदार. वेळकाळू व दप्तर दिरंगाईमुळे गावकरी अतिशय त्रस्त झालेले असून.अशा निष्क्रिय.बेजबाबदार. ग्रामसेवकाची सिरों चा,भामरागड परिसरातील अती दुर्गम भागात बदली करण्याचे मागणी जोर धरत आहे.
. कार्यरत ग्रामसेवक गावकऱ्यांना नकोसा वाटत असून सबंधित.ग्रामसेवकांनी आतापर्यंत केलेल्या कामाच्या चौकशीची मागणी सुद्धा गावकऱ्यांनी केली आहे.

