
पुलखल ग्रामपंचायत विकासात्मकं कामात प्रगतीपथावर.
गडचिरोली ( विशेष प्रतिनिधी )
विचारक्रांती न्यूज.
संपादक
अनुप मेश्राम.
गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत . व गडचिरोली पासून हाकेच्या अंतरावर असलेली ग्रामपंचायत पुलखल ही ग्रामपंचायत विकासात्मक कामात प्रगतीपथावर असून या ग्रामपंचायतीने आतापर्यंत अनेक विकासात्मक कामे प्रगतीचे शिखर गाठलेले आहे.
पुलखल ग्रामपंचायतीने जनसुविधा योजने अंतर्गत गावात तीन सिमेंट रोडचे बांधकाम.सुधा केलेले आहे.तसेच एम.आर. इजीस अंतर्गत बोर्डीचे खोलीकरण व मामा तलावाचे काम सुध्दा करण्यात आलेले आहेत.
14 वित्त आयोगा अंतर्गत शाळेची व ग्रामपंचायतीची रंग रंगोटीचे कामे. तसेच पेसा अंतर्गत मंडप,चटइ. व फंगी मशीन फवारणीचे वाटप.सुद्धा केलेले आहे.
12 वित्त आयोगा अंतर्गत खुर्च्या खरेदी. शाळेतील किशोर वहीन मुलींना पॅडचे वाटप. 20/ टक्के योजने अंतर्गत पाणी कॅन वाटप तसेच दिव्यांग लोकांना फॅन दलित आदिवासी लोकांना घमेले वाटप सुद्धा करण्यात आलेले आहेत.

आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व शाळकरी मुलांना भविष्यात त्रास होवू नये यासाठी फुलखल ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने पुलखल व मुडजा परिसरातील होत असलेली धावपट्टी सुधा रद्द करण्यात ग्रामपंचायतीने पुढाकार घेतलेला आहे..
पुलखल ग्रामपंचायतीने विकासात्मक कामाकडे लक्ष घालून गाव विकासात्मक दृष्टिकोनातून प्रगती पथावर नेण्यासाठी सरपंच श्रीमती सावित्रीबाई गेडाम. ग्राम विकास अधिकारी निळकंठ मोटघरे व ग्रामपंचायत सदस्य यांचा विकासात्मक कामात सुध्दा सिहांचा वाटा आहे

